कंगना राणौत सध्या जाम चर्चेत आहे. ठाकरे सरकारसोबतच्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगनाची जोरदार चर्चा आहे. कंगना तशी स्वभावाने परखड. आपल्या या परखड स्वभावामुळे आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक वाद ओढवून घेतले आणि या वादांना पुरून उरली. यानंतर काय तर पंगा घेणारी अभिनेत्री अशीच तिची ओळख बनली. तिच्या या स्वभावामुळे बॉलिवूडचे काही दिग्दर्शक-निर्माते जाणीवपूर्वक कंगनापासून दूर राहतात, हे एक वास्तव आहे. दिग्दर्शक विक्रम भटही यापैकी एक.नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट यांना कंगनाबद्दल छेडले गेले. वादांच्या पार्श्वभूमीवर कंगनासोबत काम करण्याची संधी मिळाल्यास करणार का? असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर विक्रम यांनी अनोखे उत्तर दिले.‘मी तिच्यासोबत काय काम करणार? आजकाल ती स्वत:च सिनेमे दिग्दर्शित करतेय. मी तिच्यासोबत काम करणारच नाही, असे मी म्हणणार नाही. पण मी तिच्यासोबत करणार काय? तिच्यासोबत सिनेमा केला तर मला चित्रपटात क्लॅप मारावी लागेल. म्हणजे मी क्लॅप बॉयच्या भूमिकेत असेन. कारण कंगना स्वत:चा कथा लिहिते, स्वत:च दिग्दर्शित करते, अशात मला कामच उरणार नाही,’ असे विक्रम भट म्हणाले.
कंगनाला काम मिळत राहिल...अलीकडे कंगना ज्या सिनेमात काम करतेय, ते सिनेमे तिने स्वबळावर मिळवलेत. सर्वांसाठी कोणी ना कोणी असतोच. सर्व मिळून कंगनाला बॉयकॉट करतील, हे शक्य नाही. कंगनाला काम मिळत राहील, असेही विक्रम भट म्हणाले.
महेश भट यांनी कंगनावर साधला निशाणा; युजर्स म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही...!
तुझ्या वडिलांना हे प्रश्न सुद्धा विचार...! ट्विटरवर कंगना राणौत- पूजा भटमध्ये घमासान
जो चलता है, उसके पीछे दुनिया भागती है...मी इंडस्ट्रीत कधीच कोणाचा द्वेष वा राजकारण केले नाही. तुम्ही व्यक्तिसोबत नाही तर त्याच्या प्रतिभेसोबत काम करता. फिल्म इंडस्ट्रीत सगळे उगवत्या सूर्याला नमस्कार करता. जे विकल्या जाते, त्याच्यामागे सगळे पळतात. आयुष्यमान खुराणा आधी काही नव्हता. आज त्याला साईन करण्यासाठी रांगा लागतात, असेही ते म्हणाले.