Join us

Confirm! साऊथचा 'हा' सुपरस्टार साकारणार मुथैया मुरलीधरनची भूमिका, बायोपिकचं नावही आहे झक्कास!

By अमित इंगोले | Updated: October 9, 2020 10:53 IST

सद्या तापसी पन्नू एकीकडे भारतीय महिला क्रिकेट टीमचं कर्णधार मिथाली राजवर बायोपिक करत आहे तर दुसरीकडे आता श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर मुथैया मुरलीधरन यांच्या जीवनावर सिनेमा बनत आहे.

फिल्म इंडस्ट्री आणि बायोपिक्सचं नातं सर्वांनाच माहीत आहे. सिनेमातील व्यक्तिमत्वांसोबतच अनेक खेळाडूंपर्यंत सर्वांच्या कहाण्या बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अनेक फिल्ममेकर्सही बायोपिक्स करण्यासाठी उत्सुक असतात. सद्या तापसी पन्नू एकीकडे भारतीय महिला क्रिकेट टीमचं कर्णधार मिथाली राजवर बायोपिक करत आहे तर दुसरीकडे आता श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर मुथैया मुरलीधरन यांच्या जीवनावर सिनेमा बनत आहे.

आता या सिनेमात मुरलीधरनचा रोल तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती साकारणार आहे. मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकबाबत काही महिन्यांपूर्वी बातमी समोर आली होती. आता अभिनेता विजय सेतुपतीने स्वत: यावर मोहर लावली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. त्याने लिहिले की, मी या शानदार प्रोजेक्टचा भाग होऊन स्वत:ला नशीबवान समजतो आहे. या बायोपिकबाबत लवकरच अधिकृत अपडेट्स समोर येतील.

आधी बातमी समोर आली होती की, लिजेंड स्पिनर मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकचं नाव '८००' असेल. याचं कारण सांगण्यात येत आहे की, मुरलीधरनने टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट घेतल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डच्या आसपास ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न होता. त्याने ७०८ विकेट घेतल्या.

विजय सेतुपतीने आपल्या एका मुलाखतीत या बायोपिकसंबंधी वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, 'मी मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकशी जुळून आनंदी आहे. तो तमिळ ओरिजनचा आयकॉनिक स्पोर्ट्समन आहे. मुलरीधरनची भूमिका साकारणं माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल आणि मी ही भूमिका साकरण्याची वाट बघत आहे'.

या सिनेमाचं दिग्दर्शन M S Sripathy करणार आहे. या सिनेमासंबंधी कास्ट आणि क्रूची घोषणा लवकरच केली जाणार आहे. विजय सेतुपती ही भूमिका साकारण्यासाठी मुथैया मुरलीधरनकडून क्रिकेटचं ट्रेनिंग घेत आहे. मुरली विजयला त्याची बॉलिंग स्टाइल शिकवत आहे.  

टॅग्स :Tollywoodआत्मचरित्रगुन्हेगारी