Join us

रंगभूमीवरचा हसरा खेळता नट मनाला चटका लावून गेला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 09:40 IST

गिरगाव येथील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास.

आपल्या अभिनयानं नाट्य आणि सीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.

प्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला अशा अनेक चित्रपटातूनं भूमिका साकारली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :मराठीटेलिव्हिजन