करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही.अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी दुर्लक्ष केलं. यांत आणखी एका नावाची भर पडली आहे. एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्री सविता बजाज हलाखीचं जीणं जगत आहे.
सविता बजाज यांच्यावर आर्थिक अडचणीमुळे बिकट परिस्थितीत जगणं त्यांच्या वाट्याला आले आहे. दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची आपबीती सांगितली. सविता बजाज यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना सुमारे 22 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. उपचारांवर त्यांची सर्व जमापुंजीच खर्च झाली. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही. त्यामुळे चिंतेत होत्या. वाढतं वय आणि आजारपणामुळे कामही करता येत नाही. अशा परिस्थितीत मी कसे जगणार असा प्रश्न त्यांच्या समोर होता.
तर दुसरीकडे सचिन पिळगांवकर यांची पत्नी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनीच पुढाकार घेत सविता बजाज यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. सिंन्टाच्या मदतीने सुप्रिया पिळगांवकर यांनी सविता बजाज यांच्या उपचारादम्यानचा सगळा खर्च देत मदत केली आहे. सुप्रिया पिळगांवर 'कुछ रंग प्यार के ऐसी भी' आणि 'जननी' या मालिकेतही त्या भूमिका साकरत आहेत.