Join us

धर्मेंद्र यांच्या डोळ्यावर पट्टी! अभिनेत्याची अवस्था बघून चाहत्यांना काळजी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:18 IST

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या डोळ्यांवर पट्टी असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात अभिनेते चाहत्यांना आवाहन करताना दिसत आहेत

बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ  अभिनेते धर्मेंद्र. २०२३ आणि २०२४ मधील सिनेमांमध्ये धर्मेंद्र (dharmendra) यांनी काम करुन त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचं दर्शन सर्वांना घडवलं. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र यांच्या एका डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसतेय. धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे. व्हिडीओत धर्मेंद्र यांनी चाहत्यांना पट्टी बांधण्यामागचं कारण सांगितलं.

धर्मेंद्र यांच्या डोळ्यावर पट्टी कारण...

धर्मेंद्र त्यांच्या कारमध्ये बसत असताना त्यांनी पापाराझींसोबत भेट घेतली. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या धर्मेंद्र यांना पाहून मीडियाने त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले, "माझ्यात अजून खूप दम आहे. माझ्यात खूप ताकद आहे. डोळ्यांमध्ये जरा त्रास होतोय. लव यू फॅन्स, लव यू ऑडियंस, मी स्ट्राँग आहे", अशा शब्दात धर्मेंद्र यांनी चाहत्यांना मेसेज दिला आहे. एकूणच डोळ्यांना काहीतरी त्रास झाल्याने धर्मेंद्र यांनी पट्टी बांधलेली दिसतेय.

धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा

धर्मेंद्र यांना अशा अवस्थेत बघून त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे. अभिनेता या दुखण्यातून लवकरात लवकर बरा व्हावा, म्हणून चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांना सदिच्छा दिल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, आगामी 'इक्कीस' सिनेमात ते झळकणार आहेत. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत जयदीप अहलावत,सिकंदर खेर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

टॅग्स :धमेंद्रबॉलिवूड