बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वरुण आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दोघे ही लग्नासाठी पूर्णपणे तयार असल्याचे कळतेय. मात्र हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार वरुण धवन लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम लगावला आहे. एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे वरुणने सांगितले आहे. याआधी अनेक वेळा वरुणने लग्न करणार पण तारीख माहिती नाही असे सांगितले होते.
लग्नाच्या चर्चांवर वरुण धवनने केला खुलासा, म्हणाला लग्न करणार पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:36 IST