वरुण धवनच्या लग्नाची बातमी सध्या बी-टाऊनमध्ये चांगलीच चर्चेत आहे. असं म्हटलं जात आहे की, वरुण लवकरच त्याची गर्लफ्रेंड नताशासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. या रविवारी दोघांचे लग्न होणार आहे.
मात्र, वरुण आणि नताशानेही आपल्या लग्नाविषयी मौन बाळगले आहे. त्याच्याकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून लग्नाविषयी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
लग्नाचे फंक्शन अतिशय खासगी ठेवले जाणार आहे.ज्यात फक्त दोघांच्या कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत.वरूण धवन अलिबागमध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहे. यासाठी तो नुकताच तिथल्या फाइव्ह स्टार हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अनेक सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात.