Join us
Daily Top 2Weekly Top 5

नताशासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी वरुण धवन तयार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 17:26 IST

वरुणने एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे सांगितले होते पण आता एक वेगळीच माहिती समोर येते आहे.

वरूण धवन-श्रद्धा कपूर सोबत ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये दिसणार आहे. यासगळ्यामध्ये वरुण धवन त्याच्या लग्नाचा चर्चांना घेऊन प्रकाशझोतात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र दोघांनी लग्नाच्या तारखेबाबत मौन सोडले नाही. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार हे कपल 2020 मध्ये लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे.

 रिपोर्टनुसार वरूण आणि नताशा एप्रिल किंवा मे महिन्याच्या शेवटपर्यंत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वरुणने एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे सांगितले आहे. मात्र रिपोर्टनुसार कपल लग्नासाठी पूर्णपणे तयार असल्याचे समजतेय.  वरूणचा आगामी सिनेमा 'कुली नंबर 1' मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे लग्नाची तारीख बदलण्याची शक्यता आहे.  

वरूण धवन  आणि श्रद्धा कपूरचा  ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा सिनेमा रेमो डिसूजा दिग्दर्शित करतोय. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘रुल ब्रेकर्स’ असे असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. श्रद्धा व वरूणसोबत नोरा फतेही ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल