Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूण धवनचा जळफळाट! म्हणे,माझ्या आईवडिलांनी मला सोडले अन् तिला दत्तक घेतले!! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:05 IST

आकाश अंबानी व श्लोका मेहताचे लग्न आणि रिसेप्शनची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या शाही लग्नाला व रिसेप्शनला हजेरी लावली. या हायप्रोफाईल लग्नानंतर बॉलिवूडच्या आणखी एका ग्रॅण्ड वेडिंगची चर्चा सुरु झाली आहे.  कुणाच्या तर वरूण धवन व नताशा दलाल यांच्या.

ठळक मुद्देमध्यंतरी नताशा व वरूण यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. वरूण आपल्या बिझी शेड्यूलमुळे नताशाला वेळ देऊ शकत नव्हता आणि यामुळे दोघांमध्येही काहीकाळ मतभेद निर्माण झाले होते. पण हे मतभेद लगेच मिटले आणि नताशा व वरूण पुन्हा एकत्र आलेत. 

आकाश अंबानी व श्लोका मेहताचे लग्न आणि रिसेप्शनची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या शाही लग्नाला व रिसेप्शनला हजेरी लावली. या हायप्रोफाईल लग्नानंतर बॉलिवूडच्या आणखी एका ग्रॅण्ड वेडिंगची चर्चा सुरु झाली आहे.  कुणाच्या तर वरूण धवननताशा दलाल यांच्या. होय, वरूण व नताशा लवकरच लग्नबंधनात अडकणार असे मानले जातेय.अंबानीच्या लग्नात वरूण धवन दिसला नाही. पण वरूणची गर्लफ्रेन्ड नताशा मात्र दिसली. ती सुद्धा वरूणच्या आई वडिलांसोबत. म्हणजेच आपल्या होणाºया सासू-सासºयांसोबत. वरूणचे पापा डेव्हिड धवन, आई करूणा आणि नताशा या तिघांनी अंबानींच्या लग्नात एकत्र हजेरी लावली. या तिघांचा फोटो पाहिल्यानंतर वरूणने काय प्रतिक्रिया द्यावी? तर त्याने चांगलीच मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या आई-वडिलांनी मला सोडले अन् कुण्या दुसºयाला दत्तक घेतलेय,’ असे वरूणने हा फोटो शेअर करत लिहिले.

नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. वरुणच्या घरच्या सगळ्या इव्हेंटला नताशा व तिचे कुटुंब हजर असते. एकंदर काय तर वरूण व नताशा या दोघांच्या नात्यावर दोन्ही कुटुंबांनीही पसंतीची मोहोर लावली आहे. धवन व दलाल दोन्ही कुटुंब या नात्यापासून आनंदी आहेत. आता हे नाते पती-पत्नीच्या नात्यात बदलण्यास तयार आहे. आता केवळ तारीख जाहिर होण्याची देर आहे. 

मध्यंतरी नताशा व वरूण यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. वरूण आपल्या बिझी शेड्यूलमुळे नताशाला वेळ देऊ शकत नव्हता आणि यामुळे दोघांमध्येही काहीकाळ मतभेद निर्माण झाले होते. पण हे मतभेद लगेच मिटले आणि नताशा व वरूण पुन्हा एकत्र आलेत. वरुणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर ‘कलंक’मध्ये तो आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर , सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहे. अभिषेक वर्मन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल