Join us

वरुण धवन आणि नताशा दलालचा थ्रोबॅक फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 18:14 IST

सध्या वरुण आणि नताशाचा कॉलेज मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल रिलेशनशीपला घेऊन सतत चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहे. रिपोर्टनुसार वरुण आणि नताशा एप्रिल- मे महिन्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांनी आपल्या लग्नाचे प्लॅनिंग पुढे ढकलले. सध्या वरुण आणि नताशाचा कॉलेज मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत नताशा आणि वरुणसोबत त्यांची एक मैत्रिणसुद्दा दिसतेय. हा फोटो वरुणच्या फॅनक्लबने शेअर केला आहे. 24 एप्रिलला वरुणने आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. रिपोर्टनुसार वरुण बर्थ डेचा मुहूर्त साधत गर्लफ्रेंड नताशासोबत साखरपुड्याची घोषणा करणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी हा प्लॅन रद्द केला.याआधी अशी चर्चा होती की दोघे डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर वरुण सारा अली खानसोबत 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच विनोदी कलाकार परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल