Join us  

हा डान्स म्युझियममध्ये ठेवणार; सलमान खानच्या या गाण्यावर वनिता-पृथ्वीकचा डान्स! चाहते म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 1:47 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात आणि पृथ्वीक प्रताप यांनी सलमान खानच्या खास गाण्यावर थेट ऑस्ट्रेलियात डान्स केलाय

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण केलंय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील लोकप्रिय कलाकार म्हणजे वनिता खरात आणि पृथ्वीक प्रताप. वनिता - पृथ्वीक यांनी केलेले एक नवीन डान्स सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांनी सलमान खानच्या खास गाण्यावर डान्स केलाय. या डान्सवर त्यांच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

वनिता खरात - पृथ्वीक प्रताप यांनी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी सलमान खान आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स केलाय. हे गाणं म्हणजे 'प्यार दिलो का मेला है'. या दोघांनी खास स्टेप करत भन्नाट डान्स केलाय. "सूचना - हा डान्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे." असं कॅप्शन देत या दोघांनी हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकारांनी या दोघांच्या डान्सचं कौतुक केलंय. तर 'डान्स करताय की डास मारायचं काम सुरु आहे', अशा गमतीशीर कमेंट लोकांनी या दोघांच्या डान्सवर केल्या आहेत. सर्वांना हसवणारे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधले कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा किती मजा करतात, हे अशा विविध व्हिडीओतून पाहायला मिळतं. हा डान्स तुम्हाला कसा वाटला?

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रापृथ्वीक प्रतापसोनी मराठी