Join us  

'वैवाहिक जीवनात...'; अखेर लग्नाविषयी वैभव तत्ववादीने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 12:13 PM

Vaibhav Tatwawaadi: लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा तुला राग येतो का?' या प्रश्नावर वैभवने दिलं उत्तर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav Tatwawaadi) . अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची तुफान क्रेझ आहे. म्हणून, वैभवच्या लव्हलाइफबद्दल वरचेवर चर्चा रंगते. वैभवची गर्लफ्रेंड आहे का? त्याचं लग्न झालंय का? असा प्रश्न त्याच्या फिमेल फॅनला कायम पडतो. विशेष म्हणजे एका मुलाखतीमध्ये वैभवने पहिल्यांदाच त्याच्या लग्नावर भाष्य केलं. 

अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलेल्या वैभवचा 'सर्किट' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या तो या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्येच एका मुलाखतीत त्याने त्याच्या लग्नाविषयी मत मांडलं आहे. 

'बऱ्याचदा तुला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा तुला राग येतो का?' असा प्रश्न वैभवला विचारण्यात आला. त्यावर, "नाही मला आता त्याचा राग येत नाही. कारण, जे लोक मला हा प्रश्न विचारतात तेच त्यांच्या आयुष्यात किंवा वैवाहिक जीवनात दु:खी असतात. त्यामुळे मग ते इतरांना सांगतात की तुम्ही हे करु नका", असं वैभव म्हणाला.

दरम्यान,वैभव मराठीतला लोकप्रिय अभिनेता आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्याने 'फक्त लढ म्हणा', 'कुरुक्षेत्र', 'हंट', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'बाजीराव मस्तानी' अशा कितीतरी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :वैभव तत्ववादीसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड