Uut Marathi Cinema: वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या मराठी मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा आहे. तारुण्याच्या पंखात अवकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा 'ऊत' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना संघर्षकथेसह एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 'ऊत' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता राज मिसाळ आणि आर्या सावे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अलिकडेच 'ऊत' या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळाअभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
दरम्यान, फिल्मी जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपट मोहोर उमटमवण्यात यशस्वी ठरला आहे.