Join us  

उर्वशी रौतेलाने अयोध्येत रामललाचं घेतलं दर्शन, लवकरच राजकारणात एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:49 AM

राजकारणात एन्ट्री करण्याआधी उर्वशीने अयोध्येत दाखल, रामललाचे घेतलं दर्शन, फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. उर्वशीने विविध सिनेमांत अभिनय करत तिच्या ग्लॅमरस अदांनी लोकांचं मन जिंकलंय. अशातच नुकतंच उर्वशीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत तिने अयोध्येतील रामललाचं दर्शन घेतलेलं दिसतंय. उर्वशी राजकारणात एन्ट्री करणार ही बातमी काल वाऱ्यासारखी पसरली. या पार्श्वभूमीवर उर्वशीचे अयोध्येतील फोटो व्हायरल झाले आहेत. 

उर्वशीचे अयोध्येतील फोटो व्हायरल झाले असून ती रामललाच्या मंदिरात गेलेली दिसतेय. उर्वशी पारंपरिक अंदाजात रामललाच्या दर्शनासाठी गेलेली दिसली. दरम्यान एका मुलाखतीत उर्वशीला राजकारणात एन्ट्रीबद्दल विचारण्यात आलं असता ती म्हणाली, "मला तिकीट मिळालंय. आता फक्त राजकारणात प्रवेश करायचा की नाही हा निर्णय माझा आहे. मी राजकारणात जाईल की नाही माहित नाही, पण याविषयी माझ्या फॅन्सच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात मला रस आहे. त्यांनीच सांगावं की मी राजकारणात जावं की नाही."

उर्वशी लवकरच आगामी JNU सिनेमातून लोकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात उर्वशी रौतेला झळकणार असून रवी किशन आणि मराठमोळा सिद्धार्थ बोडकेही सिनेमात विशेष भूमिकेत आहे. हा सिनेमा ५ एप्रिल २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून उर्वशी खुप दिवसांनी मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडअयोध्याराम मंदिर