Join us

उर्फी जावेदच्या उघड्या शरीराला झाकण्यासाठी कोट घेऊन गेली तरूणी, रागाने संतापली अभिनेत्री आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:47 IST

Urfi Javed : उर्फी कॅमेरामनला पोज देत होती. तेव्हाच अचानक एक तरूणी उर्फीला कोट घालण्यासाठी समोर येते. उर्फी तिचं हे वागणं पाहून अचानक चिडते. त्यानंतर जे झालं ते कॅमेरात कैद झालं.

Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिची सगळ्यात जास्त चर्चा होत असते. असंच काहीसं यावेळीही झालं. उर्फी नुकतीच बांद्राच्या एका रेस्टॉरन्ट बाहेर दिसली होती. ती जशी कॅमेरासमोर आली तेव्हा तिचा लूक पाहून फॅन्स हैराण झाले. नेहमीसारखी उर्फी नावाच्या कपड्यांमध्ये दिसली. उर्फी कॅमेरामनला पोज देत होती. तेव्हाच अचानक एक तरूणी उर्फीला कोट घालण्यासाठी समोर येते. उर्फी तिचं हे वागणं पाहून अचानक चिडते. त्यानंतर जे झालं ते कॅमेरात कैद झालं.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जावेद (Urfi Javed) ने जी ब्रा घातली आहे ती बघून तुम्हाला आइसक्रीमची नक्कीच आठवण येईल. हे कोन क्रोशियाने तयार केले आहेत जे तिने तिचे ब्रेस्ट कव्हर करण्यासाठी घातले आहेत. यावेळीही ती नेहमीसारखी अतरंगी दिसत आहे. ज्याला काही लोकांची पसंती तर काही लोकांची टीका मिळाली आहे.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की,  उर्फी जावेद एका रेस्टॉरन्टसमोर पोज देत आहे आणि कॅमेरामन तिचे फोटो काढत आहे. तेव्हाच एक महिला कोट घेऊन  उर्फीजवळ येते पण तेव्हाच  उर्फी चिडून तिच्याकडे बघते. यावेळी  उर्फीचा चेहरा संतापलेला स्पष्ट दिसत आहे.  

टॅग्स :उर्फी जावेदटेलिव्हिजनसोशल व्हायरल