Join us

'मी जशी कपडे परिधान करते त्याबद्दल माफ करा', आता बदलेन'; उर्फी जावेदच्या ट्विटने चाहते गोंधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:15 IST

उर्फी जावेद तिच्या आउट ऑफ द बॉक्स फॅशनसाठी ओळखली जाते.

उर्फी जावेद तिच्या आउट ऑफ द बॉक्स फॅशनसाठी ओळखली जाते. यापूर्वी ती फक्त विचित्र कपडे परिधान करून इंस्टाग्रामवर शेअर करायची. 'बिग बॉस ओटीटी'ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ती फक्त आठवडाभर राहिली पण बाहेर आल्यावर ती स्टार झाली. आता ती मोठ्या फॅशन डिझायनर्ससोबत काम करत आहे. रणवीर सिंग ते करीना कपूर यांनी तिचे कौतुक केले आहे. उर्फीला अजुनही ट्रोल केलं जातं.पण तिला याचा फरक पडला नाही. दरम्यान, शुक्रवारी तिने एक ट्विट करून नेटकऱ्यांना चकित केले.

उर्फीच्या या ट्विटमुळे तिच्या चाहत्यांनी कमेंट करुन चौकशी करण्यास सुरूवात केली. उर्फी ट्विटमध्ये म्हणाली की, मी ज्या प्रकारचे कपडे परिधान करते त्याबद्दल मी माफी मागते आणि आतापासून बदलेन, असं तिने म्हटले आहे. उर्फीला तिच्या वेगळ्या फॅशनची ओळख मिळाली आहे, त्यामुळे तिने असे ट्विट केले तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'मी जे परिधान करते त्यामुळे भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते. आतापासून तुम्हांला बदललेली उर्फी दिसेल. कपडे बदलले. क्षमा करा, असंही तिने म्हटले आहे. 

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' लेक मालती मेरीसह मुंबईत परतली, बहीण परिणीतीच्या लग्नाचंच तर कारण नाही ना?

उर्फीचे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करुन प्रश्न विचारत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, '१ एप्रिलला मूर्ख बनवण्याचा कोणताही मार्ग नाही.' दुसऱ्या यूजरने म्हटले की, 'चांगली गोष्ट आहे, रमजानमध्ये असे करणे योग्य आहे.' तर तिसऱ्याने लिहिले की, 'बघू या सुधारते की नाही.

उर्फी तिच्या फॅशनपासून दूर जाईल असा विचार तुम्ही करत असाल, तर तसं काही नाही. खरंतर उद्या ती अजिओच्या सहकार्याने तिचा ब्रँड लॉन्च करणार आहे. हे त्यांच पहिलं कलेक्शन आहे. कंपनीने याबाबत पोस्ट टाकून माहितीही दिली आहे. त्यासोबत लिहिले- 'मी ट्रेंड फॉलो करत नाही, मी सेट करते.'

टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूड