Join us

Urfi Javed : उर्फी जावेदचा नवा 'अवतार' बघितलात का? नेटकरी म्हणतात, 'बरंय कपडे तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:21 IST

उर्फीचा नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

आजकाल सोशल मीडिया सुरु केलं की विचित्र कपड्यातील उर्फी जावेद (Urfi Javed) मोर दिसते. उर्फी नेहमी विचित्र आणि तोकड्या कपड्यात दिसते. तिच्या फॅशन सेन्समुळे तिच्यावर बऱ्याच जणांनी टीकाही केली. मात्र उर्फी काही तिची फॅशन बदलत नाही. टाकाऊ गोष्टींपासून ती स्वत:च कपडे डिझाईन करते आणि ते घालते. पण अचानक कधी नव्हे ते उर्फी पूर्ण कपड्यात दिसली की नेटकऱ्यांनाही आश्चर्य वाटते. उर्फीचा असाच एक विचित्र अवतार समोर आला आहे.

उर्फीचा नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये तिने आकाशी रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसने तिचे डोळे आणि तोंड सोडून सर्व चेहरा आणि शरीर कव्हर केले आहे. अवतार सिनेमात ज्याप्रकारे सर्व कलाकारांचं शरीर निळ्या रंगाचं दिसतं तशाच स्टाईलमध्ये उर्फीने फॅशन केली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

उर्फीच्या याही स्टाईलवर नेटकऱ्यांनी हसू आवरलेलं नाही. 'काहीही असू दे पण कपडे पूर्ण घातलेत' अशी कमेंट एकाने केली आहे. 'उर्फी किती बदलली आहे,'उर्फीच्या आयडिया आता संपत चालल्या आहेत' अशा कमेंट्सही व्हिडिओवर आल्या आहेत.

टॅग्स :उर्फी जावेदसोशल मीडियासोशल व्हायरलफॅशन