Join us

पोल डान्स करतानात तोल गेला अन् धाडकन पडली उर्फी जावेद, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:23 IST

Pole Dance Video

Urfi Javed Pole Dance Video: उर्फी जावेद हे नाव आता खूप प्रसिद्ध झालंय. इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियीवर रोज दुसऱ्या दिवशी तिच्या नवनवीन आउटफिट्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालून बोल्ड अंदाजात राहणाऱ्या उर्फीच्या नव्या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे. कारण ती आता हटके कपड्यांमुळे नाही, तर पोल डान्समुळे (Pole Dance) चर्चेत आली आहे. 

उर्फीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी पांढऱ्या रंगाची ब्रॅलेट आणि जांभळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. ट्रेनर तिला खांबावर चढण्यास मदत करते. यानंतर उर्फी जावेद खांबावर चढून तिचा तोल राखण्याचा प्रयत्न करते. पणे, तेवढ्यात तिचा तोल गमावते आणि ती धाडकन पडते. यावेळी तिची ट्रेनर धावत येत तिची काळजी घेताना दिसतेय. दरम्यान, यावेळी उर्फी जास्त दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावली आहे. 

 उर्फी जावेदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ती चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बडे भैया की दुल्हनिया यांसारख्या टीव्ही शोचा भाग राहिली आहे. पण, तिला खरी लोकप्रियता २०२१ मध्ये 'बिग बॉस ओटीटी सीझन १' मधून मिळाली. २०२४ मध्ये ती 'एलएसडी २' चित्रपटात दिसली. तसेच तिची 'फॉलो कर लो यार' ही सीरिजदेखील प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

टॅग्स :उर्फी जावेदसेलिब्रिटीसोशल मीडिया