Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपेंद्रला मिळाली बिग बींची झप्पी

By admin | Updated: April 13, 2016 01:33 IST

प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, एकदा तरी बच्चनसाहेबांसोबत काम करायला मिळावे. काम नाही तर निदान त्यांना भेटण्याची संधी जरी मिळाली, तर तो कलाकार कृतकृत्य होईल.

प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, एकदा तरी बच्चनसाहेबांसोबत काम करायला मिळावे. काम नाही तर निदान त्यांना भेटण्याची संधी जरी मिळाली, तर तो कलाकार कृतकृत्य होईल. या बाबतीत उपेंद्र लिमयेचे नशीब चांगले आहे. याने केवळ बिग बीसोबत कामच नाही केले, तर त्यांची शाबासकीदेखील मिळवली आहे. सरकार राज सिनेमात अमिताभसोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली. आता खुद्द बच्चन समोर आहे म्हटल्यावर थोडा नर्व्हस होता, पण उपेंद्र ठरला हाडामांसाचा कलाकार. त्याने मन लावून तो सीन पूर्ण केला. मग काही दिवसांनंतर चित्रपटाचा ट्रायल शो पाहण्यासाठी तो संपूर्ण कुटुंबासमवेत गेला. त्या वेळी अमिताभसुद्धा उपस्थित होते. तो म्हणतो, ‘शो झाल्यानंतर बच्चनसाहेबांनी मला मिठी मारली आणि माझ्या कामाची स्तुती केली. हे सर्व माझ्यासाठी खूप अनपेक्षित होते. एवढ्या मोठ्या कलाकाराची शाबासकी मिळणे आणि तीदेखील एवढ्या आत्मीयतेने, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.’