Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी चालताना गडबडली अन् मग धपकन पडली! हाय हिल्सने अभिनेत्रीची पंचायत, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:07 IST

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री हिल्समुळे पडल्याचं दिसत आहे.

आऊटफिटमुळे अनेकदा सेलिब्रिटींची फजिती होताना दिसते. अशाच एका अभिनेत्रीचीही हाय हिल्समुळे पंचायत झाली. हाय हिल्स घालणं अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री हिल्समुळे पडल्याचं दिसत आहे. 

अभिनेत्री कंगना शर्माला नुकतंच स्पॉट करण्यात आलं. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करत त्यावर हाय हिल्स घातल्या होत्या. मात्र हे हाय हिल्स घालणं तिच्या अंगाशी आलं. या हिल्समुळे कंगनाला धड चालताही येत नव्हतं. सुरुवातीला पापाराझींना पोझ देत असताना चालताना ती गडबडली. आणि नंतर पायऱ्यांवरुन उतरत असताना धपकन खाली पडली. कंगना शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. केवळ हाय हिल्समुळेच नव्हे तर अतरंगी ड्रेस घातल्यामुलेळी नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. "चालता येत नाही मग हिल्स घालायचे कशाला?", "अजून स्टाइल मारा", "आपण पण कधी ना कधी पडलोच असू. फक्त ही स्विमिंग कॉस्ट्युम घालून पडली", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी