Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना खानने साईन केलेत तीन सिनेमे! ‘कमोलिका’साठी नाही वेळ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 06:00 IST

टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि एक दु:खाची अशा दोन बातम्या आहेत.

टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि एक दु:खाची अशा दोन बातम्या आहेत. आनंदाची बातमी ही की, हिनाने एकापाठोपाठ एक असे तिन हिंदी सिनेमे साईन केले आहेत. यातील एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. दुसरी दु:खाची बातमी म्हणजे, एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रीय मालिकेत हिना केवळ काही दिवसांची पाहुणी आहे. दुसºया शब्दांत सांगायचे तर ‘कसौटी जिंदगी की’मधील हिना साकारत असलेली कमोलिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्पॉटबॉयचे मानाल तर येत्या मार्चपासून हिना खान शोमध्ये दिसणार नाही. तीन चित्रपट साईन केल्यामुळे डेलिसोपसाठी हिनाजवळ वेळ नाही, म्हणून तिने ही मालिका सोडल्याचे कळतेय. पण एक दुसरीही चर्चा रंगतेय. त्यानुसार, कमोलिकाच्या रोलवर हिना समाधानी नव्हती. हिनाने साईन केलेल्या प्रोजेक्टमध्ये एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. तूर्तास याचा खुलासा झालेला नाही. पण तिच्या डेब्यू सिनेमाचे शूटींग मात्र अखेरच्या टप्प्यात असल्याचे कळतेय. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट आहे. यात हिना एका स्वतंत्र बाण्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरवर आधारित आहे.

हुसैन खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा राहत काजमी आणि शक्ती सिंह यांनी लिहिलीय. हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहु’ म्हणून अधिक ओळखतात. आपली ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला. साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता....’मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली. ‘बिग बॉस 11’ आणि ‘खतरों के खिलाडी सिझन 8’मध्येही ती सहभागी झाली.

टॅग्स :हिना खानकसौटी जिंदगी की 2