Join us
Daily Top 2Weekly Top 5

काम करूनही पैसे मिळेनात! मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला- "मालिकेचे ८०० भाग झाले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:31 IST

मालिकेत काम करूनही पैसे न मिळाल्याने संतापला मराठी अभिनेता, म्हणतो- "फोन, मेसेज करुनही..."

आशय कुलकर्णी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आशयने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्याचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच आशय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असतो. पण, नुकतंच आशयने एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. 

मालिकेत काम करूनही अद्याप आशयला त्याच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत पोस्टमधून त्याने संताप व्यक्त केला आहे. "शूटला वेळेत येण्याची अपेक्षा असते मग पैसे वेळेत देता येत नाहीत का?" असा सवाल त्याने या पोस्टमधून केला आहे. 

आशय कुलकर्णी काय म्हणाला? 

मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शो चे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, त्या शोचे EP यांना वारंवार फोन केले, मेसेजे केले, ईमेल केले...तरी पैसे मिळत नाहीयेत.  आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते तेही वेळेत...पण मग वेळेत पैसे देता का येत नाही?? 

आशयने त्याच्या पोस्टमध्ये कोणत्याही मालिकेचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे त्याचा रोख नेमका कुणाकडे आहे, हे कळू शकलेलं नाही. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझा होशील ना', 'पाहिले न मी तुला' या मालिकांमुळे तो घराघरात पोहोचला. 'मुरांबा', 'सुंदरी' या मालिकांमध्येही तो दिसला होता. सध्या तो 'सुख कळले' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. व्हिक्टोरिया या सिनेमातही आशयने महत्त्वाची भूमिका साकारली होती.  

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसेलिब्रिटी