Join us

'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."

By कोमल खांबे | Updated: September 18, 2024 12:18 IST

Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.

उत्कृष्ट कथा, सिनेमॅटोग्राफी, क्लायमॅक्स आणि व्हिएफएक्स याची उत्तम अनुभुती देणारा तुंबाडसिनेमा ६ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. २०१८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज ६ वर्षांनीही तुंबाडला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. याच निमित्ताने 'तुंबाड' सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहम शाहने लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली. 

'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, "अनिताबरोबर काम करताना मला खूप मजा आली. आम्ही खूप वेळ एकत्र काम केलं होतं". अनिताबरोबर या सिनेमात दीपक दामले, ज्योती मालशे हे मराठी कलाकारही झळकले होते. 

'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाच्या सीक्वलची घोषणाही करण्यात आली आहे. लवकरच 'तुंबाड २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सोहमने 'तुंबाड २' बाबतही हिंट दिली. या सिनेमाचं कास्टिंग सुरू असून २०२५ मध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

टॅग्स :तुंबाडअनिता दातेसिनेमा