Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू तेव्हा तशी'मधील चित्रलेखाची खऱ्या आयुष्यातील बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही आहेत प्रसिद्ध अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:37 IST

Tu Tevha Kashi:‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.

झी मराठी वाहिनीवर नुकतीच ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Kashi) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट आहे. मालिकेत कित्येक वर्षानंतर या दोन कॉलेजपासूनच्या मित्र मैत्रिणीची अचानक भेट घडून येते. मालिकेतला अनामिकाचा वावर बिनधास्त आहे तर तिथेच सौरभ मात्र लाजरा, कमी बोलणारा आणि पुरता गोंधळलेला पाहायला मिळाला. शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) हिने अनामिकाची दिलखुलास भूमिका साकारली आहे. तर सौरभच्या भूमिकेत स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) पाहायला मिळते आहे.

तू तेव्हा तशी या मालिकेत शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी शिवाय अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले, अभिज्ञा भावे, सुहास जोशी हे कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या लेकीची देखील एन्ट्री झाली आहे. नुकतेच झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची एन्ट्री झाली आहे. मोहन जोशी यांनी साकारलेली जगन्नाथ चौधरीची भूमिका आता प्रदीप वेलणकर साकारताना दिसत आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची लेक देखील झी मराठी वाहिनीवर महत्वाची भूमिका साकारणार आहे.

तू तेव्हा तशी या मालिकेतील चित्रलेखाची भूमिका मीरा वेलणकर हिने साकारली आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून मीरा वेलणकर चित्रलेखाची भूमिका साकारत आहे. बऱ्याच वर्षानंतर मीराने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्यामुळे तिच्यासाठी ही भूमिका खूप खास आहे.

मीरा वेलणकर हिने जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून शिक्षण घेतले आहे. मीरा ही जाहिरातींचे आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करते. याशिवाय झी मराठीवरील बंधन या लोकप्रिय मालिकेतून तिने अभिनय देखील केला होता. मीराची धाकटी बहीण मधुरा वेलणकर साटम ही देखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तुमची मुलगी काय करते या मालिकेत मधुरा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

टॅग्स :मधुरा वेलणकरस्वप्निल जोशी