Join us  

टायगर झाला चिंतामुक्त

By admin | Published: June 02, 2014 9:10 AM

‘हीरोपंती’ रिलीज झाल्यानंतर आपली तुलना जॅकी श्रॉफशी केली जात नसल्याचे बघून अभिनेता टायगर श्रॉफ सध्या अत्यंत खुश आहे.

स्टार पुत्रांची तुलना त्यांच्या वडिलासोबत करण्याचा ट्रेड बॉलीवूडमध्ये प्रचलित आहे; परंतु ‘हीरोपंती’ रिलीज झाल्यानंतर आपली तुलना जॅकी श्रॉफशी केली जात नसल्याचे बघून अभिनेता टायगर श्रॉफ सध्या अत्यंत खुश आहे. ‘हीरोपंती’बाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रेक्षक काय पसंत करतील व कशाला नाक मुरडतील, हे कुणीच सांगू शकत नाही, या चित्रपटासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे चिंतामुक्तीचा अनुभव मी घेत आहे, असे टायगरने सांगितले.