Join us
Daily Top 2Weekly Top 5

'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्याची लेकीने काढली दृष्ट, बापलेकीच्या नात्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 14:13 IST

समीरने इन्स्टाग्रामवरुन लेकीचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समीरची लेक त्याची दृष्ट काढताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच 'थोडं तुझं थोडं माझं' ही नवीन मालिका छोट्या पडद्यावर सुरू झाली आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहेत. 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेतून शिवानी-समीर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत समीर तेजस प्रभू ही भूमिका साकारत असून त्याला प्रेक्षकांचं प्रेमही मिळत आहे. 

समीर हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्टबद्दल तो पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवरुन लेकीचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समीरची लेक त्याची दृष्ट काढताना दिसत आहे. "काही दिवस आजी येऊन गेली की होणारा After effect😅...शास्त्र असतं ते", असं त्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. समीरच्या निरागस लेकीचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. बापलेकीच्या या हृदयस्पर्शी व्हिडिओने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. 

समीरच्या या व्हिडिओवर चाहत्यांबरोबरच कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. दरम्यान, समीरने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेआधी तो 'गोठ' आणि 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत दिसला होता. अभिनेत्याबरोबरच समीर एक उत्तम गायकही आहे. 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरूणाईचा' या रिएलिटी शोमध्ये त्याने सहभाग घेत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार