Join us  

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या या क्युट मुलाला ओळखलंत का?, शाहरुख-आमिर-सलमान त्याच्या लोकप्रियतेसमोर फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 8:00 AM

फोटोत आईसोबत दिसणारा हा मुलगा एकेकाळी बॉलिवूडचा सर्वात जास्त डिमांड असलेला अभिनेता होता.

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे.

फोटोत आईच्या मांडीवर बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, या चॉकलेट हिरोवर लाखो मुली घायाळ होत्या. या अभिनेत्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे त्यांनी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून जुगल हंसराज आहे. जुगल हंसराज अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसला आहे. आजकाल जुगल हंसराज चित्रपटसृष्टीपासून दूरअसला तरी सोशल मीडियावर तो खूप सक्रिय दिसतो. सध्या जुगल आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहतो.

जुगल कुटुंबाव्यतिरिक्त, त्याचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर खूप शेअर करतो. जुगल हंसराजचा बालपणीचा एक फोटो पुन्हा इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आईसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये जुगल हंसराजची आई त्याच्या मांडीवर हसत हसत त्याच्याकडे पाहत आहे. त्याचबरोबर जुगल देखील त्याच्या आईच्या कुशीत खूप आनंदी दिसत आहे. हा फोटो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. 

जुगल हंसराजचा लूक आता खूप बदलला आहे. तुम्ही त्याला आता ओळखू शकणार नाही. अलिकडेच अभिनेत्याचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो अनुपम खेरसोबत दिसत आहे. 

टॅग्स :जुगल हंसराज सेलिब्रिटी