Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' गोष्ट ठरली हिना खानसाठी सुखद धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 14:51 IST

हिना खान ही ‘स्टार’ परिवारात गेली आठ वर्षे एक आदर्श सून म्हणून प्रसिध्द होती. ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’मधील अक्षराने आता एका खलनायिकेच्या भूमिकेत ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत एंट्री केली आहे

‘स्टार’ परिवारातील सर्वात लाडकी सूनबाई असलेली हिना खान हिचे कोमोलिकाच्या भूमिकेद्वारे पुन्हा एकदा पुनरागमन झाले आहे. ‘स्टार परिवार पुरस्कार 2018' सोहळ्यात हिनाच्या पुनरागमनाची घोषणा करण्यात आली होती.

हिना खान ही ‘स्टार’ परिवारात गेली आठ वर्षे एक आदर्श सून म्हणून प्रसिध्द होती. ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’मधील अक्षराने आता एका खलनायिकेच्या भूमिकेत ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत एंट्री केली आहे. यावर भाष्य करताना ती  म्हणाली, “स्टार परिवारात पुन्हा परतणं ही एक सुखद भावना आहे. ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’मधील अक्षराच्या व्यक्तिरेखेने मी माझ्या व्यावसायिक कारकीर्दीला प्रारंभ केला आणि स्टार परिवारानेही मला खूप प्रेम देत आपल्यात सामावून घेतलं. आता स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याची कल्पना फारच छान आहे. या परिवाराचा भाग असताना मी फार आनंदात दिवस घालविले असून आता पुन्हा एकदा मी या परिवारात सहभागी झाले आहे, याचा मला फार आनंद होत आहे. स्टार परिवार पुरस्कार सोहळा हा दरवर्षी आधीच्या पेक्षा खूपच भव्य असतो आणि यंदाही त्याने ही परंपरा कायम राखली आहे.” हिना खानची कोमोलिकाची भूमिका रसिकांना भावते आहे. हिना आणखीन एकता कपूरच्या एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :हिना खानकसौटी जिंदगी की 2