Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ती फुलराणी'मध्ये मंजू-शौनकच्या संसारात येणार अनेक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 13:38 IST

मंजू-शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटे त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत.

मंजू-शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटे त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्कारून या दोघांनी लग्न केले खरे पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूला घरची सून म्हणून स्वीकारलेले नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे. त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरू आहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू-शौनकच्या पाठी पडली आहेत.

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या फुलराणीवर ओढवली आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मंजू आपले शिक्षणाचे स्वप्न कसे काय पूर्ण करणार? यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार? देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळणार आहेत प्रेमाचा महिना समजला जाणाऱ्या फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारीचे ९, १६, २३ या तीनही शनिवारी ती फुलराणीचा एक तासाचा विशेष भाग तुम्ही पाहू शकणार आहात.

या प्रेमाच्या महिन्यात मंजू-शौनकचे प्रेम कितीसे बहरते आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांना ते कसे पार करतात जाणून घेण्यासाठी पाहत रहा एक तासाचे हे विशेष भाग सोनी मराठीवर पाहायला मिळेल.

टॅग्स :सोनी मराठी