Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते' फेम अश्विनीचा भाऊ झाला उपसरपंच, म्हणाली... आपल्याला राजकारणाचा वसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:32 IST

'आई कुठे काय करते' फेम अनघा फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेचा भाऊ उपसरपंच झालाय

'आई कुठे काय करते' ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका. ही मालिका गेली ४ हून अधिक वर्ष लोकांचं मनोरंजन करत आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना लोकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. मालिकेतील अनघाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडेचं खुप फॅन फॉलोईंग आहे. अश्विनीचा भाऊ बद्री हा पसरणी गावचा उपसरपंच झालाय. त्यामुळे अश्विनीने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केलाय.

अश्विनीने तिचा भाऊ उपसरपंच झाल्याचे फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करुन अश्विनी लिहीते, "बद्री...तू फार संयमी बाबा... शांत आणि फक्त शांत. तू आज पसरणी गावचे #उपसरपंच म्हणून पदभार स्विकरल्याबद्दल अभिनंदन.... तुझ्या हातून नानांच्या आशीर्वादाने उतमोत्तम कामे व्हावी ..आपल्याला राजकारणाचा वसा देणाऱ्या #नानांनी समाजासाठी कामी येणे किती महत्त्वाचे आहे हेच कायम मनी रुजवले. आज या महत्त्वाच्या घटनेसाठी जे जे तुझ्यापाठी उभे राहिले त्यांची मी कायम ऋणी राहीन..."

अश्विनीचा भाऊ बद्री उपसरपंच झाल्याबद्दल मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी अभिनंदन केलंय. अश्विनी कायम तिच्या कुटूंबाबद्दल पोस्ट शेअर करत असते. अश्विनी सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिनय करत आहे शिवाय ती अहिल्याबाई होळकर सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनमराठी