Join us  

Devmanus 2 Promo : बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 2:50 PM

Devmanus 2 : झी मराठीवरील ‘देवमाणूस 2’ या मालिकेत सध्या एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण  नवा प्रोमो समोर आल्यानंतर अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

झी मराठीवरील  (Zee Marathi)  ‘देवमाणूस 2’  (Devmanus 2) या मालिकेत सध्या एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.  इन्स्पेक्टर मार्तंड जामकर आणि डॉक्टर अजितकुमार यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इन्स्पेक्टर जामकर सध्या अजितकुमार विरोधात पुरावे  गोळा करतो आहे आणि लवकरच एक मोठा पुरावा जामकरांच्या हाती लागेल, असं वाटतंय. किमान मालिकेचा नवा प्रोमो पाहून तरी हेच दिसतंय. नव्या प्रोमोमध्ये डॉक्टर अजितकुमारला फाशी होण्याचे संकेत दिले आहेत. हा नवा प्रोमो उत्कंठावर्धक असला तरी, तूर्तास प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मात्र वेगळ्याच आहेत. होय, हा नवा प्रोमो समोर आल्यानंतर अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

‘बास्स झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा,’अशा शब्दांत प्रेक्षकांनी आपला वैताग बोलून दाखवला आहे. ‘आम्हाला देवमाणूस 3 बघायची बिल्कुल इच्छा नाही. पोलिसांची बदनामी करून गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणं थांबवा, देवीसिंगला फाशी झालेली दाखवून मालिका योग्य वेळी संपवा,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘नुसती फालतुगिरी सुरू आहे या सीरिअलमध्ये. पोलिस कमजोर आहेत असं दाखवलं आहे आणि हे एकदम चुकीचं आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

‘तुम्हाला वाटतं असेल की डॉक्टरला फाशी होईल तर अशा अपेक्षा झी मराठीकडून ठेवूच नका. कारण कोणतीही नवीन मालिका येणार अशी घोषणा झालेली नाही. सरळ सरळ प्रेक्षकांना मूर्ख बनवले जाणार आहे आणि अजून 1 वर्ष तरी देवमाणूस संपणार नाही आणि डॉक्टरला फाशी होणार नाही, त्यासाठी तुम्हाला देवमाणूस 3ची वाट पाहावी लागेल,’ असं एका युजरने लिहिलं आहे.

येत्या रविवारी दोन तासांचा विशेष भागएकीकडे अजितकुमारने आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली जमकरला दिली आहे. पण पुराव्यांअभावी तो डॉक्टरला अटक करू शकत नाही. येत्या रविवारी या मालिकेचा दोन तसंच विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. झी मराठीने नुकतंच त्याचा प्रोमो रिलीज केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अजितकुमार त्याने आतापर्यन्त केलेल्या खुनांची उजळणी करतोय आणि शेवटी ‘आता जामकर तुझा नंबर’ असं म्हणतोय. पण तेवढ्यात ‘काय ती रस्सी, काय तो फास, काय तो खटका, एकदम ओक्के!’ असा जामकरचा आवाज ऐकायला येतो आणि अजितकुमारच्या गळ्यासमोर फास येतो. त्यामुळे देवमाणूस २ मध्ये येणारा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

  

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाझी मराठीटेलिव्हिजन