Join us

झीनत अमान झळकणार माय लाइफ, माय स्टोरी या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 17:06 IST

झीनत अमान या अभिनेत्रीने सत्तरीचा काळ गाजवला. त्या काळातील ती सगळ्यात बोल्ड अभिनेत्री होती. मिस एशिया पॅसिफिक ही सौंदर्य ...

झीनत अमान या अभिनेत्रीने सत्तरीचा काळ गाजवला. त्या काळातील ती सगळ्यात बोल्ड अभिनेत्री होती. मिस एशिया पॅसिफिक ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर झीनतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला एक ग्लॅमरस अभिनेत्री मानले जात असे. माय लाइफ, माय स्टोरी या कार्यक्रमात झीनत अमान झळकणार असून ती तिच्या करियरमधील आठवणी लोकांसोबत शेअर करणार आहे. तसेच या बॉलिवूडमध्ये तिचा प्रवेश कसा झाला हेदेखील सांगणार आहे. हरे राम हरे कृष्ण या चित्रपटातील दम मारो दम या गाण्यातील झीनत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. एका पार्टीत देव आनंद यांनी झीनतला पाइपने धुम्रपान करताना पाहिले आणि तिथे त्यांना त्यांच्या चित्रपटातील नायिका जेनिस सापडली असे म्हटले जाते. झीनतने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीचा काळ हा खूपच वाईट होता. कारण तिचे शिक्षण परदेशात झाले असल्याने तिला हिंदी भाषा चांगल्याप्रकारे बोलता येत नव्हती. झीनतने माय लाइफ, माय स्टोरी या कार्यक्रमात तिची अनेक गुपिते उलगडली आहेत. ती सांगते, "मी हिंदी चित्रपटांची नायिका असली तरी मी या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कधीच हिंदी चित्रपट पाहिले नव्हते. मला हिंदी चित्रपट आवडतच नव्हते. माझे वडील अमानुल्ला खान हे अमन या टोपण नावाने लिखाण करत असत. मुगल-ए-आझम, पाकिजा यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले होते. पण मी माझ्या वडिलांसोबत नव्हे तर माझ्या आईसोबत आणि माझ्या सावत्र वडिलांसोबत राहात होते. माझे सावत्र वडील जर्मन असल्याने माझा हिंदी चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. पूरब और पश्चिम हा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हरे राम हरे कृष्ण या चित्रपटासाठी मी इंग्रजीत ऑडिशन दिले होते. पण मीच या चित्रपटात काम करावे या निर्णयावर देवानंद ठाम होते. माय लाइफ, माय स्टोरी या कार्यक्रमात झीनत तमानने आपल्या आयुष्याचे अनेक पैलू उलगडले आहेत.