Join us
Daily Top 2Weekly Top 5

​झीनत अमान आणि झरिना वहाब दिसणार लव्ह लाइफ स्क्रू अप्स या वेबसिरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 17:22 IST

झीनत अमान आणि झरिना वहाब यांनी इश्क, इश्क, इश्क या चित्रपटात ४३ वर्षांपूर्वी काम केले होते. देव आनंद यांच्यासोबत ...

झीनत अमान आणि झरिना वहाब यांनी इश्क, इश्क, इश्क या चित्रपटात ४३ वर्षांपूर्वी काम केले होते. देव आनंद यांच्यासोबत त्या दोघी या चित्रपटात झळकल्या होत्या. त्या दोघींनी या चित्रपटात बहिणीची भूमिका साकारली होती. इरिना यांनी तर याच चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा चित्रपट खूपच खास आहे. आता प्रेक्षकांना झरिना वहाब आणि झीनत अमान यांची जोडी अनेक वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे. लव्ह लाइफ स्क्रू अप्स या वेबसिरिजचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. आता या वेबसिरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये झरिना वहाब एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. पहिल्या सिझनमध्ये झीनत अमान एका मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता झीनत अमान यांच्या मैत्रिणीची भूमिका झरिना वहाब दुसऱ्या सिझनमध्ये साकारणार आहेत. झरिना आणि झीनत अमान या एकाच वर्गात शिकलेल्या असल्याचे आपल्याला या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे. युवराज पराशर या वेबसिरिजचे निर्माते आहेत. झरिना वहाब या झीनत अमान यांच्या खूप मोठ्या फॅन असल्याने त्या झीनत अमानसोबत काम करण्यास खूप उत्सुक आहेत. त्या सांगतात, मी माझ्या करियरची सुरुवात त्यांच्यासोबत केली होती. त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला मजा येणार याची मला खात्री आहे. लव्ह लाइफ स्क्रू अप्स या वेबसिरिजच्या या दुसऱ्या सिझनमध्ये काही मित्रमैत्रिणींची कथा पाहायला मिळणार आहे. या वेबसिरिजचे चित्रीकरण गुजरातमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.