Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दिग्पाल लांजेकर तू माझा सांगातीमध्ये परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 17:36 IST

दिग्पाल लांजेकरने तू माझा सांगाती या मालिकेत सावजी ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती ...

दिग्पाल लांजेकरने तू माझा सांगाती या मालिकेत सावजी ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून ही भूमिका मालिकेत दाखवली जात नाहीये. पण आता मालिकेत सावजी परतणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा लाडका दिग्पाल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तू माझा सांगाती या मालिकेत तो परतत असून तो पुन्हा एकदा सावजी याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. पण आता दिग्पालचा लूक खूपच वेगळा असणार आहे. दाढी आणि केस वाढलेला सावजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकाच मालिकेत दोन वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांना त्याला पाहाता येणार आहे. या मालिकेसाठी तो लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. दिग्पालने सखी या मालिकेत पूर्वी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तो अस्मिता या मालिकेमध्ये झळकला.दिग्पाल गेल्या कित्येक महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर होता. त्याने दरम्यानच्या काळात कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग केले होते. पण आता तो पुन्हा मालिकांकडे वळला आहे. काही महिन्यांपूर्वी सख्या रे या मालिकेत देखील त्याची एंट्री झाली होती. सख्या रे या मालिकेत तो सध्या आकाश राजे ही भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत त्याची व्यक्तिरेखा ही काहीशी नकारात्मक आहे. दिग्पाल हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने अनेक मालिकांचे संवाद लिहिले आहेत. आता तो सख्या रे या मालिकेचे संवादही लिहितोय.