Join us

छोट्या पडद्यावरील 'आदर्श' अभिनेत्रीचे हे रुप पाहून तुम्हाला धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 13:09 IST

छोट्या पडद्यावरील वारीस ही मालिका रसिकांच्या मनात घर करतेय. रसिकांना या मालिकेचं कथानक चांगलंच भावतंय. विशेष म्हणजे मालिकेतील अंबा ...

छोट्या पडद्यावरील वारीस ही मालिका रसिकांच्या मनात घर करतेय. रसिकांना या मालिकेचं कथानक चांगलंच भावतंय. विशेष म्हणजे मालिकेतील अंबा ही व्यक्तीरेखा साकारणारी आरती सिंह रसिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत तिचं आदर्श आणि संस्कारी असं रुप रसिकांना पाहायला मिळतंय. त्यामुळे तिचा अभिनय रसिकांकडून पसंत केला जात आहे. मात्र आरती सिंहचे सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल झालेत. हे फोटो पाहून तिच्या आदर्श आणि संस्कारी इमेजला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नुकतंच आरतीने एक फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये विविध अंदाजात तिचे फोटो क्लिक करण्यात आलेत. या फोटोंमध्ये आरतीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. ग्लॅमरस अंदाजातील आरतीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्रामवर खुद्द आरतीने आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. बोल्ड फोटो शेअर करताना तिने एक विशेष पोस्ट ही तिनं लिहलीय. त्यात ती म्हणते कॉम्पिलिकेटेड... बट स्टील गॉड्स फेव्हरेट चाईल्ड. सध्या नेटिझन्स आणि आरतीच्या फॅन्समध्ये याच फोटोंची चर्चा ऐकायला मिळतेय. आरतीचा हा अशाप्रकारचा ग्लॅमरस अंदाज पहिल्यांदाच समोर आलेला नाही. ती कायम आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या ऑनस्क्रीन इमेजपेक्षा आरती रिअल लाइफमध्ये बरीच वेगळी आणि बोल्ड असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची बहिण आहे. भावाप्रमाणेच आरतीनेही मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर टीव्ही सृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वारीस मालिकेआधी आरतीने मायका नावाच्या मालिकेतही काम केलं आहे.