Join us
Daily Top 2Weekly Top 5

"फक्त नटून साडी नेसून स्त्री होता येत नाही", स्त्री वेशातील हा अभिनेता ओळखा पाहू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:43 IST

साडी परिधान केली असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा समीर आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

आपला हजरजबाबी अभिनय आणि कॉमेडीमुळे रसिकांना हसून हसून लोटपोट करण्याचे काम कॉमेडी कलाकार करत असतात. अशाच कॉमेडी कलाकारांमध्ये नाव घ्यावे लागेल ते अभिनेता समीर चौगुले यांचं. सोशल मीडियावरही समीर चौगुले बराच सक्रीय असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून  आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतात. शिवाय फोटो आणि व्हिडिओसुद्धा तो शेअर करतात.

 

 नुकताच त्यांनी एक फोटो  शेअर केला आहे. सध्या हा फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यांत समीर महिला अवतारात पाहायला मिळत आहे. त्यांनी साडी परिधान केली असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा समीर आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. त्यांचा हा लूक आजच्या आघाडीच्या नायिकांनाही टक्कर देईल.

महिला दिनाचे निमित्त साधत त्यांनी हा फोटो शेअर केला असून त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, जगातल्या प्रत्येक महिलेला....सलाम.....स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे आणि राहणार.........जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे ते रसिकांना खळखळून हसवतात.

 

छोट्या पडद्यावरील विविध मालिका, सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. 

टॅग्स :समीर चौगुले