Join us

सलमान खानसोबत तुम्हीही खेळू शकता ‘१० का दम’, पण कसे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 18:58 IST

सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमाल दाखविण्यासाठी येत आहे. होय, ‘१० का दम’ हा त्याचा शो लवकरच सुरू होणार आहे.

लवकरच सुपरस्टार सलमान खानचा ‘१० का दम’ हा शो सुरू होणार आहे. सोनीच्या ट्विटर हॅण्डलवरून गेल्या काही दिवसांपूर्वी या शोचा एक टीजर शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये सलमान खान म्हणताना दिसत आहे की, ‘आ रहा हूं मैं’ वास्तविक अशा प्रकारच्या शोमध्ये एंट्री करण्यासाठी सर्वसामान्य प्रेक्षकांना एक चांगली संधी असते. कारण अशाप्रकारच्या शोच्या माध्यमातून एक तर चांगली रक्कम जिंकता येऊ शकते. त्याचबरोबर आपल्या फेवरेट स्टारला जवळून भेटताही येते. त्यामुळे तुम्हीही या शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही ही बातमी संपूर्ण वाचायलाच हवी. सलमानच्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी शोच्या निर्मात्यांकडून लवकरच एक अ‍ॅप लॉन्च केला जाणार आहे. हा अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून लॉग इन केल्यानंतर प्रेक्षकांना त्यामध्ये काही बेसिक डिटेल्स भराव्या लागतील. यादरम्यान तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. ज्याचे उत्तर तुम्हाला अतिशय चाणाक्ष पद्धतीने द्यावे लागतील. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला होय किंवा नाही या पद्धतीने देता येतील. हे सर्व करीत असताना तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार भाषा निवडता येईल.  जर तुम्हाला हिंदीमध्ये उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही हिंदी भाषा निवडू शकाल, जर तुम्हाला इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही इंग्रजीचे आॅप्शन निवडू शकाल. यादरम्यान तुम्हाला ४० लेवल पार कराव्या लागतील. प्रत्येक लेवलमध्ये २० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक लेव्हल पार केल्यानंतर खेळणाºया प्रेक्षकाला एक गिफ्टही दिले जाईल. यादरम्यान ज्या प्रेक्षकाने सर्वांत जास्त स्कोर केला असेल त्याला आॅडिशनसाठी बोलाविले जाईल. हे आॅडिशन क्लिअर केल्यानंतरच संबंधित प्रेक्षकाला सलमान खानसोबत ‘१० का दम’ खेळण्याची संधी मिळणार आहे. आता कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की, लेव्हल दरम्यान कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचाले जातील. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘तुम्ही तुमच्या केसांना रोज तेल लावता काय?’, तुम्ही तुमच्या वडिलांना कवटाळून मिठी मारली काय?’, ‘तुम्ही शाकाहारी आहात काय?’ अशाप्र्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुम्हाला जर या शोमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही अशाप्रकारची तयारी करू शकता. दरम्यान, या शोमध्ये भाग घेण्यासाठी या शनिवारी हे अ‍ॅप लॉन्च केले जाणार आहे. हे अ‍ॅप १८ मार्चपासून उपलब्ध होणार आहे.