Join us
Daily Top 2Weekly Top 5

“तू माझा सांगाती” या मालिकेत तुकोबांना लागलीय विठ्ठलाच्या दर्शनाची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 14:37 IST

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका “तू माझा सांगाती” मध्ये प्रेक्षकांना संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश ...

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका “तू माझा सांगाती” मध्ये प्रेक्षकांना संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ – संत तुकारामांविषयी जाणून घेता येत आहे. तुकोबांच्या अभंगवाणीने प्रत्येक मराठी मनात अभंग स्थान मिळवलं आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेत रेखाटण्यात येत आहे. हजारहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे... जिथे तुकोबांना लागणार आहे विठुरायाच्या दर्शनाची आस... पण भक्ताची ही आस भगवंत पूर्ण करणार का? कशी पूर्ण करणार? हा प्रवास आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. तू माझा सांगाती मध्ये प्रेक्षकांना आजवर संत चोखा मेळा, संत एकनाथ आणि नुकतीच संत सावता माळीची कथा बघायला मिळाली आहे. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता मालिका एका नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. कारण, गावातील मंबाजी यांचे संत तुकारामांना नेहेमी कमी लेखणे, त्यांच्या भक्तीवर प्रश्न करणे, त्यांच्या गोष्टींमध्ये कुरघोडी करणे असे त्यांचे सतत सुरू असते. आता हेच मंबाजीने संत तुकाराम यांना डिवचण्यासाठी एक नवी युक्ती योजणार आहेत. ज्याद्वारे ते तुकोबांना विचारणार आहेत की, तुम्ही विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहात, त्यांची सेवा करता परंतु तुम्हाला अजून भगवंताने दर्शन का दिले नाही. संत सावता माळी, संत चोखा मेळा, संत एकनाथ या सगळ्यांना त्यांनी दर्शन दिले आहे, त्यांची भक्ती स्वीकारली आहे. संत तुकोबा हे ऐकून खूप खचून जातात आणि ही घडलेली घटना आवलीला सांगतात. आवली यावरून मंबाजीला खूप सुनावते आणि विठ्ठलाच्या समोर कधी न गेलेली आवली पहिल्यांदा विठ्ठलासमोर नवऱ्यासाठी गाऱ्हाण सांगते की, तुकोबांना तुम्ही दर्शन का देत नाहीत. आता यामागे भगवंताची काय इच्छा आहे? विठ्ठल संत तुकाराम यांना कधी दर्शन देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.Also Read : "तू माझा सांगाती" मालिकेत विठ्ठलपंत कुलकर्णीच्या एका वेगळ्या भूमिकेत शेखर फडके