Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू आहे खूप बोल्ड, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:40 IST

ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली आहे. या मालिकेतील स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.  या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकरने ओम आणि अन्विता फलटणकरने स्वीटूची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

शाल्व किंजवडेकरने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शाल्व सोबत असलेली ही मुलगी कोण असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले होते. विशेष करून अनेक तरुणींनी ही तुझी गर्लफ्रेंड आहे का? तुझे लग्न झाले आहे का? असे अनेक प्रश्न त्याला विचारले होता. 

अभिनेता शाल्व किंजवडेकर रिलेशनशीपमध्ये आहेत. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव श्रेया डाफळापूरकर असे आहे. शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशनशीपला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.

त्यांच्या रिलेशनशीपला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाल्वने श्रेयासोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता आणि लिहिले होते की, दोन वर्षे वेडेपणा आणि प्रेमाची. खासगी आयुष्याबद्दल शाल्व उघडपणे बोलत नाही.

पण श्रेया सोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावरील शाल्व शेअर करत असतो. त्यातून त्यांचे चांगले बॉण्डिंग पहायला मिळते.

श्रेया डाफळापूरकर ही स्टायलिस्ट असून तिचे स्वतःचे फॅशन लेबलसुद्धा आहे.

तर शाल्वने हंटर, मेड इन हेवन आणि वन्स अ इअर या चित्रपटांमध्ये काम केले आहे.