Vishal Nikam Post: छोट्या पडद्यावरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील राया-मंजिरीच्या जोडीने अक्षरश: मालिका रसिकांना भुरळ घातली आहे. सध्या या मालिकेत मंजिरी रायासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करणार असल्याचा रोमॅन्टिक ट्रॅक सुरु आहे. अभिनेता विशल निकम आणि पूजा बिरारीचा ऑनस्क्रिन दिसणारा बॉण्ड ऑफस्क्रिन देखील तितकाच छान आहे. अशातच आज आपली सहकलाकार पूजा बिरारीच्या वाढदिवसानिमित्त विशालने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता विशाल निकमने सोशल मीडियावर मंजिरी म्हणजेच पूजासोबत खास फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर तिला वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा देखील दिल्या आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की,"Happy Birthday to रायाची मिस फायर आणि विशालची अत्यंत चांगली मैत्रीण... # आज ९ ऑगस्टला तुझा वाढदिवस. त्यासाठी मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो की तुला आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होवो आणि तुला जे पाहिजे ते मिळो. शिवाय तुझ्या चेहऱ्यावरील स्माईल अशीच कायम ठेव."
त्यानंतर विशालने पुढे लिहिलंय, "आज तुझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या आवडीचा फोटो मी शेअर करतो आहे. तर अजून काय हा कायम सुखात आणि आनंदात राहा...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूजा...Ps- हूश्श !! केवढं लिहलं मी आज... इस बात पर पार्टी तो बनता हैं. तुला काय गिफ्ट पाहिजे ते सांग." अशी सुंदर पोस्ट लिहून अभिनेत्याने पूजाला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.