वीरा, अकबर बिरबल यांसारख्या मालिकेमध्ये झळकलेली विश्वप्रीत कौर एक चांगली अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली गायिका असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. विश्वप्रीतने नुकतेच सुलतान या चित्रपटातील जग घुमिया हे गाणे स्वतःच्या आवाजात गावून त्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगला पोस्ट केला. या गाण्याला तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याविषयी विश्वप्रीत सांगते, "मी सलमानची खूप मोठी फॅन असल्याने सुलतान हा चित्रपट मी फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिला होता. या चित्रपटातील हे गाणे तर मला प्रचंड भावले होते. हे हृदयाला भिडणारे गाणे आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला हे गाणे सगळ्यांनी नक्कीच ऐकवावे असे मला वाटते. या गाण्याचे भाव मला आवडले असल्याने हे गाणे मी गाण्याचे ठरवले. माझे गाणे माझ्या फॅन्सना खूप आवडत आहे."
विश्वप्रीत बनली गायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:21 IST