Join us

अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी तितीक्षा तावडे करायची हे काम,वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 18:14 IST

आपल्या आवडत्या कलाकारांच्या आवडी-निवडी त्याच्याशी संबंधीत सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची रसिकांची इच्छा असते. छोट्या पडद्यावर सरस्वती भूमिकेतून अभिनेत्री तितीक्षा ...

आपल्या आवडत्या कलाकारांच्या आवडी-निवडी त्याच्याशी संबंधीत सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची रसिकांची इच्छा असते. छोट्या पडद्यावर सरस्वती भूमिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे  रसिकांचे तुफान मनोरंजन करतेय.'सरस्वती' मालिकेतल्या तिच्या भूमिकेविषयी ती सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहत असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.इतकेच नाहीतर तिने क्लिक केलेल्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स देत असतात.विशेष म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये तिचा ट्रॅक आवडला किंवा नाही आवडला या गोष्टीही चाहत्यांमुळे कळत असतात.वेगवेगळे प्रश्न विचारत तितीक्षाशी चाहते संवाद साधत असतात.आज तितीक्षा तावडेने तिच्या अभिनय कौशल्यामुळे रसिकांची मनं जिकंली आहेत.आज हे स्थान मिळवण्यासाठी तिलाही खूप स्ट्रगल करावा लागला आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तितीक्षा मॅक्डोनल्डमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होती.तिने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले असल्यामुळे मॅनेजर म्हणून काही वर्ष काम केले. हे काम करता करता तिने अभिनयाची आवडही जोपासली.टीव्हीवर झळकायचे म्हणून या क्षेत्रात येण्यापेक्षा आपण खरंच त्या गोष्टीला न्याय देऊ शकतो का या गोष्टीची जाणीव झाल्यानंतरच तिने अभिनयक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.तितीक्षाने अभिनय क्षेत्रात एंट्री करत एक चांगली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.तितीक्षाचे हे यश पाहता तिच्या कुटुंबियांचाही चेह-यांवरचा आनंद काही औरच असतो असे तितीक्षाने सिएनएक्समस्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवून जात असतो त्यानुसार मेहनत करत राहणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात असल्याचे तितीक्षाने सांगितले.