Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’मधील कलाकार मणिंदरसिंह शाहरूख खानसाठी करणार हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:55 IST

आपल्या उपहासात्मक प्रसंगांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’ ही ‘स्टार भारत’वरील सर्वात विनोदी मालिका आहे. मालिकेचा नायक ...

आपल्या उपहासात्मक प्रसंगांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’ ही ‘स्टार भारत’वरील सर्वात विनोदी मालिका आहे. मालिकेचा नायक मणिंदर सिंह हा मालिकेत खानियाची भूमिका साकारीत असून त्याच्या अभिनयाबद्दल त्याची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे. मालिकेच्या आगामी भागांत तो आपल्या पाच पत्नींचे मन राखण्यासाठी पाच वेगवेगळ्या भूमिका करताना दिसेल. या भागांत मणिंदर सिंह आपल्या पाच पत्नींच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार शाहरूख कानच्या पाच गाण्यांवर नाच करणार आहे. मणिंदर हा हरहुन्नरी अभिनेता तर आहेच, पण तो उत्तम नर्तकही असल्याने त्याला या वेगवेगळ्या भूमिका उभ्या करणे सोपे जाते. त्यामुळे त्याने या नृत्यांचे सर्व चित्रीकरण एका दिवसात पूर्ण केले! छायालेखक आणि इतरांना या गाण्यांच्या चित्रीकरणात भरपूर वेळ जाणार असे वाटत होते. पण मणिंदरने एकाच दिवसात सर्व चित्रीकरण पूर्ण केल्याने त्याच्या दिग्दर्शकाने त्याचे जोरदार अभिनंदन केले.या चित्रीकरणाबद्दल मणिंदर सिंहशी बोलल्यावर तो म्हणाला, “मला नाच करायला खूप आवडतो आणि या गाण्यांवर नृत्य करताना मला खूपच मजा आली. मी शाहरूखचा प्रचंड मोठा चाहता असून त्याच्या गाण्यांवर नत्य करणं हा मी माझा सन्मानच समजतो. शाहरूखचा वाढदिवसही नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने माझे हे नाच त्याला वाहिलेली आदरांजलीच आहे, असं मी मानतो.”

केदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामोदरपंत, यंदा कर्तव्य आहे, जत्रा यांसारखे अनेक चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांप्रमाणे मराठी मालिकांचे देखील दिग्दर्शन केले आहे. मधु इथे आणि चंद्र तिथे, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय यांसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. मराठी रंगभूमीला देखील त्यांनी लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत, तू तू मी मी, सही रे सही यांसारखी दर्जेदार नाटकं दिली आहेत. मराठीतील एक प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तो बात पक्की या हिंदी चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते आणि आता ते  क्या हाल मिस्टर पांचाल? या हिंदी मालिकेच्या दिग्दर्शनाकडे वळले आहेत.या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती...क्या हाल मिस्टर पांचाल? मालिकेत दाखवण्यात आली आहे.