Join us

एकता लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:50 IST

बालाजी प्रोडक्शनची चंद्र-नंदिनी ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रत्येक गोष्टीत निर्माती एकता कपूर जातीने लक्ष देत ...

बालाजी प्रोडक्शनची चंद्र-नंदिनी ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रत्येक गोष्टीत निर्माती एकता कपूर जातीने लक्ष देत आहे. या मालिकेसाठी तिने खूप सारे संशोधन केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तिरेखेचा लुक कसा असावा यावरही ती अभ्यास करत आहे. ही मालिका आतापर्यंतच्या छोट्या पडद्यावरच्या सगळ्या मालिकांपेक्षा वेगळी आणि चांगली असली पाहिजे यासाठी ती प्रयत्न करत आहे. या मालिकेच्या कथानकातही तिने अनेक बदल सुचवले आहेत. सुरुवातीला कथा ऐकल्यानंतर तिला ती कथा तितकीशी आवडली नव्हती. त्यामुळे तिने यात अनेक सुधारणा सांगितल्या आहेत. एकताची टीमदेखील या मालिकेच्या कथानकावर खूपच मेहनत घेत आहे. एक चांगली मालिका प्रेक्षकांसमोर आणण्याचे संपूर्ण टीमने ठरवले आहे.