Join us

"बापमाणूस" दादासाहेबांच्या मागचं शुक्लकाष्ट येत्या गुढीपाडव्यापासून सुटेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 12:30 IST

आजच्या नवतरुणांच्या मनात असलेले नेमके प्रश्न, त्याच्या आयुष्यात सुरु असलेल्या, त्यांना जवळच्या वाटणाऱ्या गोष्टी या कथा - मालिकेच्या रूपात ...

आजच्या नवतरुणांच्या मनात असलेले नेमके प्रश्न, त्याच्या आयुष्यात सुरु असलेल्या, त्यांना जवळच्या वाटणाऱ्या गोष्टी या कथा - मालिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात येतात.विविध चॅनलवर सुरु असणा-या मालिकेमधून दाखवण्यात येणाऱ्या विषयामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन देण्याचा प्रत्येक मालिकेचा प्रयत्न महाराष्ट्राच्या तरुण वर्गाला निश्चितपणे आकर्षित करतो.यामध्ये अशीच एक आपलं दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे. "बापमाणूस"गुढीपाडवा सणाच्या दिवशीच मोठ्या मुलाची अनुपस्थिती वाड्यातील सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रूपात दिसत आहे.एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन दादासाहेब सगळ्यांना धीर देत यंदाचा गुढीपाडवा नेहमीच्या हर्षोल्हासात साजरा करायला समजावतात.छोटीशी इरा आपल्या वडिलांना म्हणजेच चंद्राला भेटण्याचा हट्ट धरून बसलेली आहे.दादासाहेब इन्स्पेक्टर पवारांची मदत घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर चंद्रा आणि इराची भेट घडवून आणतात.दादासाहेब आणि सूर्याच्या मागे लागलेला कट कारस्थानांचा ससेमिरा अजूनही कमी होत नाही आहे.चंद्रा आणि इरा भेटल्यानंतर तिथे ठाकूर येतो.सूर्या ठाकूरला घडत असलेली परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा ठाकूर सूर्याच्या कानाखाली लगावतो.सूर्या तिरमिरीत घरी येऊन स्वतःला खोलीत बंद करून घेतो.ऐन सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने घरातील सगळेच लोक काळजीत पडतात.ठाकूरने सर्वांसमोर केलेल्या सूर्याच्या अपमानाचं उत्तर दादासाहेब आणि सूर्या कसे देतील? चंद्राच्या अनुपस्थितीमध्ये घरातली गुढी कोण उभारेल? चंद्राचा गुढीपाडवा पोलीस स्टेशनमध्ये कसा असेल? हर्षवर्धन येत्या नवीन वर्षात दादासाहेबांविरुद्ध नेमकं कोणतं नवं कुभांड रचेल? अशा सगळ्या गोष्टी येणा-या भागात रसिकांना पाहायला मिळणार आहे.फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर बापमाणूस या शब्दाला टॅग करत प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील बापमाणसाचा फोटो पोस्ट करत होते.'बापमाणूस' हा हॅशटॅग अभिनेता सुयश टिळक याने सुरू केला होता.या हॅशटॅगच्या माध्यमातून सुयशने माझा #BaapManus माझे बाबा... तुमच्या आयुष्यात कोण आहे असं बापमाणूस? मी माझ्या काही मित्रांना टॅग करून त्यांच्या आयुष्यातला बापमाणूस कोण आहे ते विचारतो आहे? तुम्हीही विचारा... तुम्हीसुद्धा त्यांचा फोटो आणि ते बापमाणूस का हे स्पष्ट लिहून आपल्या मित्रपरिवारापैकी पाच जणांना टॅग करा आणि त्यांच्या आयुष्यातल्या बापमाणसाबद्दल लिहायला सांगितले होते.