Join us

'भारत' आणि 'इंडिया'मधला फरक दाखवण्यात यशस्वी ठरणार का 'सेठजी'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 16:00 IST

आज टेक्नोसॅव्ही जगात वावरताना काही गावांचा मात्र विकास झालेला नसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतेय. मात्र काही गाव अशीही आहेत ...

आज टेक्नोसॅव्ही जगात वावरताना काही गावांचा मात्र विकास झालेला नसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतेय. मात्र काही गाव अशीही आहेत ज्यांनी आपल्या हिंमतीवर प्रगतीच्या दिशेन वाटचाल सुरू केली आहे. अशीच काहीशी कथा नवीन सुरू होणारी मालिका सेठजी मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री गुरदीप कोहली सेठजीच्या मुख्य भूमिकेतून पुनरागमन करत असून ती देवसुच्या परंपरा, नियम यांना सांभाळते. ती अतिशय न्याय्य असून आपल्या घरातील लोकांनाही त्यांच्या चूकीसाठी शिक्षा करायला मागेपुढे पाहत नाही. सेठजीचा भावुक आणि निरागस मुलगा बाजीरावच्या रूपात अविनाश कुमार छोट्‌या पडद्यावर पदार्पण करतोय. त्याच्या नायिकेच्या म्हणजेच शहरी सुंदर मुलगी प्रगतीच्या रूपात रम्मन अहमद झळकणार आहे.डिजिटल भारताकडे वेगाने वळत असताना देवसुसारख्या गावात आजही काँक्रीट रस्ते, गाड्‌या,ईलेक्ट्रिसिटी, सुविधेच्या गोष्टी, एटीएम्स किंवा मोबाईल नेटवर्क अशा कुठल्याही गोष्टी नसल्या तरी ते आनंदात आहेत आणि त्यांच्या गरजेसाठी पुरेशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत. सेठजीचा मुलगा बाजीराव हा अतिशय साधा मुलगा असून त्याने देवसु गावाबाहेर आजपर्यंत काहीही पाहिले नसून प्रगती मात्र एक गावाबाहेरची आधुनिक विचारांची मुलगी असून तिने आजपर्यंत देवसुसारखे गांव  पाहिलेले नाहीये.ती देवसुमध्ये वैयक्तिक कारणांनी प्रवेश करते पण तिला हे माहिती नसते की बाहेरच्या लोकांना देवसु गावात प्रवेश मिळत नाही. जेव्हा शहरी बिनधास्त प्रगती सेठजीला भेटेल आणि देवसुमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताना दिसेल त्याचबरोबर पारंपारिक विचारांचा बाजीराव शहरी आणि पुढारलेल्या विचारांच्या प्रगतीच्या प्रेमात कसा पडतो आणि त्यांच्या आयुष्यात पुढे कसे बदल होतात अशी काहीशी कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे.