'तुझ्या रूपाचं चांदनं' मालिकेत फुलेल का नक्षत्रा आणि दत्तामधील अबोल नातं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:27 IST
Tujhya Rupacha Chandana: पदोपदी आपल्या बाजूनं उभ्या रहाणार्या दत्तामधला चांगला माणूस पुन्हा एकदा मी परत आणेन असे वचन नक्षत्रा येत्या भागामध्ये घेताना दिसणार आहे.
'तुझ्या रूपाचं चांदनं' मालिकेत फुलेल का नक्षत्रा आणि दत्तामधील अबोल नातं !
'तुझ्या रूपाचं चांदनं' मालिकेत (Tuzya Rupacha Chandana) गरीबाघरी सौंदर्य हे शाप असतं आणि नक्षत्राचं सुंदर रूप तिची आई समाजापासून लपवून ठेवते. लहानपणापासूनचं मनात अनेक प्रश्न घेऊन नक्षत्राचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात नक्षत्राला समाजाच्या अनेक डागण्या, दूषण सहन करावी लागली. या सगळ्या अडचणींना सामोरे जात असतानाच आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर तिला दत्ता भेटला. सुंदर रूपाचा तिरस्कार करणारा दत्ता नक्षत्राला प्रत्येक संकटामधून वाचवू लागला.
नक्षत्रा तिचं खरं रूप काही कारणांमुळे लपवत आहे या सत्यापासून अनभिज्ञ असलेल्या दत्ताने नक्षत्राला त्याच्याच घरी रहाण्याची परवानगी दिली. आपल्या भूतकाळाच्या खुणा मागे सोडत आणि मोरेसारख्या माणसांपासून स्वत:चा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी नक्षत्राने काही पावलं उचलली. तिला तेव्हा हे माहिती नव्हतं पुढे देखील तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे. पण या सगळ्यामध्ये दत्ताची साथ तिला प्रत्येक क्षणी मिळते आहे. आणि यामुळेच तिला कुठेतरी वाटते आहे दत्ता हा वाईट माणूस नसून त्याचा चांगला चेहरा त्याने लपवून ठेवला आहे. पदोपदी आपल्या बाजूनं उभ्या रहाणार्या दत्तामधला चांगला माणूस पुन्हा एकदा मी परत आणेन असे वचन नक्षत्रा येत्या भागामध्ये घेताना दिसणार आहे.
नक्षत्राने अद्याप नाही मिळविला दत्ताचा विश्वासदत्ताचा विश्वास अजूनही नक्षत्राने पूर्णपणे मिळवला नाही, पण तरीदेखील त्या दोघांमध्ये एक धागा आहे जो त्यांना जोडून ठेवतो आहे. नक्षत्राच्या निर्णयामुळे या दोघांच्या आयुष्याला कुठलं नवं वळण मिळेल हे लवकरच कळेल. नक्षत्रा तिच्या प्रयत्नात यशस्वी होईल ? नक्षत्रा – दत्ता अबोल नातं फुलू शकेल ? नक्षत्राच्या या प्रयत्नात तिला कोणाची साथ मिळेल ? पुढे येणार्या संकटांवर ती कशी मत करेल ? एकीकडे तिरस्कार आणि दुसरीकडे सत्य या दुधारी तलवारीवर चालताना कुठली नवं आव्हान यांच्यासमोर येतील ? जाणून घेण्यासाठी बघत राहा तुझ्या रूपाचं चांदनं दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.