Join us

'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत त्याचे ईशावरील प्रेम करेल का व्यक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 07:15 IST

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की दिल वाले दुल्हनिया चित्रपटाप्रमाणे विक्रांत ईशाच्या घरी तिच्या लग्नासाठी मदत करायला येतो.

ठळक मुद्देमालिकेचं कथानक अगदी रंजक वळणावर आलं आहेकी विक्रांत ईशाला विसरण्यासाठी तिला स्वतःपासून दूर करेल?

'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली.अभिनेता सुबोध भावेने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय तसेच नवोदित अभिनेत्री गायत्री दातारसह त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचेही भरपूर प्रेम मिळतंय.

मालिकेचं कथानक अगदी रंजक वळणावर आलं आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की दिल वाले दुल्हनिया चित्रपटाप्रमाणे विक्रांत ईशाच्या घरी तिच्या लग्नासाठी मदत करायला येतो पण टिल्लू परिवाराचा खरा चेहरा विक्रांतसमोर येतो आणि तो ईशाला अशा स्वार्थी कुटुंबात लग्न करून जाण्यापासून वाचवतो. ईशाचं लग्न तर तुटतं पण आता पुढे काय?  ईशाच्या मनात विक्रांतसाठी ज्या भावना आहेत ती त्या ऑफिसमध्ये त्यांच्यात होणाऱ्या कुडमुडींमुळे व्यक्त करू शकत नाही आहे. पण लवकरच ईशा अप्रत्यक्षपणे काहोईना पण विक्रांतला तिच्या मनात त्याच्याविषयी असलेल्या भावनांची जाणीव करून देणार आहे. विक्रांतच्या मनात नक्की काय आहे हे कोणालाच कळत नाही आहे. तो नकळतईशाकडे ओढला जातोय पण प्रेमाच्या आड येणारं वय बहुधा त्याला मागे खेचतंय. लवकरच प्रसारित होणाऱ्या एक तासाच्या विशेष भागात ईशा विक्रांतच्या मनातील भावना जाणूनघेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसणार आहे. त्यामुळे विक्रांत तिच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करू शकेल का? की विक्रांत ईशाला विसरण्यासाठी तिला स्वतःपासून दूर करेल?

 

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे