Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोस्ती बँड सुरांच्या कसोटीला खरा उतरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 15:57 IST

झी युवा ही वाहिनी नेहमीच तिच्या युथफूल आणि फ्रेश कंटेंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अाली आहे. झी युवा वरील आघाडीची ...

झी युवा ही वाहिनी नेहमीच तिच्या युथफूल आणि फ्रेश कंटेंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अाली आहे. झी युवा वरील आघाडीची मालिका फुलपाखरू मधील मानस आणि वैदेहीच्या गोड प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. प्रेमाच्या एक ना अनेक परिभाषा उलगडवत, मानस (यशोमान आपटे) आणि वैदेही (हृता दुर्गुळे) यांच्या नितांत सुंदर प्रेमाचा प्रवास आपल्या मनापर्यंत पोहोचवणारी झी युवावरील एक प्रेमळ मालिका म्हणजे "फुलपाखरू". रॉकीने वैदेहीला दिलेल्या चॅलेंजनुसार दोघेही पुर्ण तयारीनिशी एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. मानस वैदेहीचा दोस्ती बँड त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक संकटामधून मार्ग काढत जिंकण्याची पूर्ण तयारी करत आहे. समीरला झालेल्या अपघातानंतरही तो एका हाताने का होईना पण ड्रम वाजवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची जिद्द पाहून त्याचे सर्व साथीदार त्याला सपोर्ट करतायेत. मानसला त्याच्या बाबांच्या तब्येतीमुळे टेन्शन आलं होतं, ज्यामुळे मानस बँड सोडण्याचा विचार करत होता पण त्याच्या बाबांनीच मानस आणि वैदेहीला निक्षून सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे. त्यामुळे मानस वैदेहीने नव्या जोमाने पुन्हा प्रॅक्टिस सुरु केली आहे. दुसरीकडे माया आणि रॉकी दोस्ती बँडला अजून अडचणीत कसं आणता येईल यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत.समीरला झालेला अपघात हा माया आणि रॉकीने घडवून आणला होता हे मानस वैदेहीला कळेल का? एकामागे एक येणाऱ्या संकटाना तोंड देत दोस्ती बँड त्यांची तयारी कशी सुरु ठेवेल? अवघ्या काही दिवसांवर आलेली कॉन्सर्ट मानस वैदेही जिंकणार का?