अशी दिसणार पल्लवी प्रधान खलनायिकेच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 12:44 IST
आपल्या कट-कारस्थानांनी आणि विविध योजनांनी सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार््या खलनायिकांची विविध रूपे आजवर अनेक दैनंदिन मालिकांतून पाहायला मिळाली आहेत.‘जीजी ...
अशी दिसणार पल्लवी प्रधान खलनायिकेच्या भूमिकेत
आपल्या कट-कारस्थानांनी आणि विविध योजनांनी सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार््या खलनायिकांची विविध रूपे आजवर अनेक दैनंदिन मालिकांतून पाहायला मिळाली आहेत.‘जीजी माँ’ या नव्या मालिकेत आजवर कधी न पाहिलेले खलनायिकेचे रूप पल्लवी प्रधान साकारणार आहे. पल्लवी प्रधान खलनायिकेची भूमिका प्रथमच रंगवणार असून ती तिचे हे नवे रूप पाहून अनेक महिला तिचा तिरस्कार केल्याशिवया राहणार नाहीत.मालिकेतील उत्तरादेवीच्या भूमिकेत शिरल्यावर पल्लवीला ओळखणे अवघड बनते. तिचे रूप ठसठशीत करण्यासाठी खास तिच्यासाठी तयार करण्यात आलेले दागिने, बिंदी, सिंदूर आणि कपड्यांमुळे तिचे रूप बदलून जाते.तिच्या भल्या मोठ्या बिंदीचा रंग तिच्या सिंदुराशी रंगसंगती साधतो.बिंदी आणि सिंदूर यांच्या या रंगसंगतीमुळे नवा फॅशन ट्रेंड निर्माण होईल, यात शंकाच नाही! याशिवाय ती मोठ्या आकाराची कानातील कुंडले घालताना दिसेल. ही कुंडले म्हणजे जणू काही ईअरफोन्सच असल्यासारखे वाटतात.तिच्या कपड्यांबद्दल बोलायचे झाल्यास वेशभूषाकारांनी तिची साडी ही लेहेंग्यासारखी बनविली आहे. ते पाहून असा लेहेंगा आपल्या वॉर्डरोबमध्ये असावा, अशी इच्छा प्रत्येक स्त्रीला होईल. वेशभूषेप्रमाणेच तिने आपले धारदार संवादही खणखणीत आवाजात म्हटले असून त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच आकार लाभतो. आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल पल्लवीने सांगितले की,“या मालिकेतील माझ्या रूपाच्या बदलाचं सारं श्रेय मी निर्माती किन्नरी मेहता आणि आमच्या वेशभूषाकारांना देईन. माझे कपडे आणि त्यांना साजेसे दागदागिने यांची निवडया दोघांनी केली आहे.मुळात माझा पेहराव कसा असावा यावर एकाप्रकारे रिसर्च करण्यात आले त्यानंतर सर्व दागिने आणि माझी साडी याचे डिझाईन करण्यात आले. पल्लवीतून माझं रूपांतर उत्तरादेवीत करण्यात माझ्या रंग आणि केशभूषेचाही मोठा वाटा आहे. हे दागिने आणि कपडे दिसायला जड वाटले, तरी मला ते सहज घालता येतील, अशाप्रकारे ते बनविण्यात आले आहेत. मी केवळ माझ्या भूमिकेतच नव्हे, तर माझ्या लूकमध्येही फार मोठा बदल होताना अनुभवत आहे.”मात्र आता रसिकांवर माझी भूमिका आणि माझा हा पेहरवा किती छाप पाडण्यात यशस्वी ठरतो हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे पल्लवीने सांगितले.